औरंगाबाद: अभियांत्रिकी पॉलिटेक्निकसह आदी अभ्यासक्रमात उच्च पदवी मिळवूनही अनेकांना बेरोजगाराच्या यादीत राहावे लागत आहे. असे असले तरी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्रात ऑनलाईन नोंदणीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच कंपनीसह विविध ठिकाणी अनेकांना रोजगारही उपलब्ध करुन दिले जात आहे २०१६ ते २०१९ या चार वर्षात तब्बल २७ हजार ६९३ जणांना रोजगार विभागाने रोजगार उपलब्ध करुन दिले आहे.
वर्षामध्ये हजारो विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मात्र अनेकांना उच्च पदवी असून बेरोजगाराच्याच यादीत राहावे लागते. अशा वेळी अनेकजण रोजगार विभागात ऑनलाईन नोंदणीवर भर देतात. त्यात आयटीआय धारकांबरोबर बारावी पास विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात २०१६ पासून ते २०१९ पर्यंत जिल्हाभरात तब्बल ७६ हजार ५५६ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २७ हजार ६९३ जणांना रोजगार विभागाने रोजगार उपलब्ध करुन दिला आहेत. चार वर्षात २७ हजार ६९३ रोजगार, २०१६ यावर्षी तब्बल औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सोयगांव, सिल्लोड आणि वैजापूर तालुक्यातून तब्बल १९ हजार १०८ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आठ हजार ४१२ जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला. याशिवाय मध्ये २३ हजार ६३१ नोंदणी झाली. त्यापैकी ८ हजार ५५७ जणांना रोजगार उपलब्ध झाला. २०१८ यावर्षीही आकडा वाढला असून ३० हजार ८४७ जणार्ींनी नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ७४२ जणांना रोजगार उपलब्ध झाला. याशिवाय यावर्षी मार्च अखेर तब्बल २ हजार ९७० जणांनी नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ७४२ जणांना रोजगार उपलब्ध झाला. याशिवाय यावर्षी मार्चअखेर तब्बल २ हजार ९७० जणांनी नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ७४२ जणांना रोजगार उपलब्ध झाला. एकूण जिल्हाभरात ७६ हजार ५५७ पैकी २७ हजार ६९३ जणांना रोजगार उपलब्ध झाला.
४८ हजार ८६३ बेरोजगाराच्या यादीत
अनेकदा कुशल मनुष्यबळ मिळत नाही. तसेच कमी पगारावर कुणी नोकरी करायला तयार नसते. यामुळे काही जणांना बेरोजगारीच्या यादीत राहावे लागत आहे. २०१६ ते २०१९ मध्ये तब्बल जिल्हाभरातील ४८ हजार ८६३ जण बेरोजगार यादीत असल्याची नोंद जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राने केली आहे.